आतापर्यंत 118 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
राज्यातील महानगरांमध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बीड जिल्ह्यात सुदैवाने अजुनही ही स्थिती नियंत्रणात आहे. आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता कोणीही कुठेही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान शनिवारी (दि.11) सकाळी बीड जिल्ह्यातून 8 जणांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. लवकरच ते रिपोेर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात रविवार (दि.12)पर्यंत एकुण 126 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 118 संशयितांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील 92 तर अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या 26 जणांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात शनिवारी नव्याने 2 तर अंबाजोगाईत 5 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे तर एकुण 8 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. आज सायंकाळ पर्यंत हे अहवाल मिळणार आहेत.
Leave a comment