बदनापूर । वार्ताहर
तालुक्यातील गेवराई बाजार येथील शासकीय गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरणांतर्गत लावलेल्या व वाढवलेल्या झाडांची कत्तल करून अतिक्रमण करून हडपण्याचा प्रयत्न सुरू असताना गावकरी, सरपंच, माजी सरपंच केलेल्या तक्रारीनंतरही महसूल प्रशासन कानडोळा करत असल्यामुळे गावकर्यांत संभ्र्म निर्माण होत आहे.
बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई हे मोठे गाव असून या गावातील गट क्रमांक 54 व 56 अंतर्गत जवळपास 80 हेक्टर शेतजमीन असून ही सर्व शेतजमीन महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून गायरान म्हणून आहे. या शेतजमिनीत 2004-05 या वर्षात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने या जमिनीत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आलेले होते. या ठिकाणी हे झाडे मोठाले झालेले होते. त्यानंतर या गायरानातून मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग गेल्यामुळे या महामार्गासाठी 20 हेक्टर शेजमिन देण्यात आली. उर्वरित 60 हेक्टर जमिनीवर दहा ते बारा वर्षे वयाची विविध प्रकारची झाडे वाढलेली होती. मात्र काही लोकांनी सरसकट या झाडांची कत्त्ल करून या ठिकाणी या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे गेवराईच्या गावकर्यांनी महसील प्रशासन, तहसीलदार यांना निवेदन दिली. तसेच या बाबत मुख्यमंत्रयांनाही निवेदने पाठवलेली आहेत. असे असतानाही बदनापूर महसूलचे पथक ढिम्म बसून त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावकर्यांना नाराजी आहे. शासनाच्या वतीने झाडे लावण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने वारंवार झाडे लावण्याचा खर्च करण्यात येत असताना या दोन्ही विभागांनीही या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केलेलेच दिसून येते. गावकर्यांनी वारंवार मागणी करूनही झाडे तोडणार्यावर व अतिक्रमण कारवाई होत नसल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदरील जमीन वन विभागाकडे हस्तांतरीत करून वृक्ष लागवड करा
आमच्या शासकीय जमिनीवर वृक्षतोड करून गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण केलेले असून त्या संबंधात गावकर्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने गा्रमपंचायतच्या वतीने तहसीलदार, बदनापूर व जिल्हाधिकार्यांना यांना अहवाल सादर करण्यात आला असून या ठिकाणी वृक्षतोड झालेली असल्यामुळे ही जमिन वन विभागाकडे वर्ग करून सदर जमिनीवर पुन्हा वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे या गावचे सरपंच सुरेश लहाने यांनी सांगितले.
...नसता जनहित याचिका दाखल करू
लाखो वृक्षांची कत्तल करून शासकीय जमीन हडपण्याचा प्रकार येथे सुरू असून या शासकीय जमीनीतील वृक्षतोड करून मुरुम उपसा झाल्याने गावकर्यांच्या वतीने आवाज उठवण्यात आलेला असतानाही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे जर लवकर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर जनहित याचिका दाखल करू असे या गावाचे ग्रामस्थ दादाराव कान्हेरे यांनी सांगून महसूल प्रशासनाला इशारा दिला.
Leave a comment