जालना । वार्ताहर
घनसावंगी विधानसभा मतदार संघात शेतकर्याच्या विविध मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री व परतूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या सुचनेवरून घनसावंगी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसिलदार देशमुख साहेब व तालुका कृषी अधिकारी काळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, शेतकर्यांनी पेरणी केलेले सोयाबीनचे बोगस बियाणे विरुध्द तक्रारीची दखल, युरिया व रासायनिक खतांचा झालेला तुटवडा, शेतकर्यांच्या पीक कर्जा संदर्भातील तक्रारी अशा विविध शेतकर्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना भाजपा अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव, भाजपा घनसावंगी विधानसभा प्रमुख ह.भ.प.रमेश महाराज वाघ, मग्रारोहयो ता.अध्यक्ष अंकुशराव बोबडे, भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे, भास्कर पांढरे, योगेश ढोणे,रमेश काळे, अर्जुनराव माळोदे, सुरेश उगले, सुरेश पोटे, बाळासाहेब बोरकर, उद्धव काकडे, बाळासाहेब बहिर, विलास चव्हाण, नाना सोळंके, बळीराम शिंदे, जयराम मिसाळ, नंदकुमार शिंदे, युवराज जाधव, शिवाजी पुरुके, माऊली धांडगे, अर्जुन पुरूके, अमोल लांडगे, उत्तम भालेकर, बाबासाहेब शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment