भोकरदन । वार्ताहर
माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांची जयंतीनिमित्त श्री गणपती इंग्लिश हायस्कूल भोकरदन येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते स्व शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राजाभाऊ देशमुख म्हणाले की स्व.शंकरराव चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त मराठवाडा साठी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या निर्मितीच्या माध्यमातून जलक्रांती करण्याचे काम त्यांनी केले याच बरोबर ते उत्कृष्ट प्रशाक्षकही होते त्यांचे मराठवाड्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. मला यावेळी सांगावेसे वाटते की ‘शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटीया’ संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार त्यांचे पुत्र व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे. यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हासरचिटनीस भाऊसाहेब सोळुंके, ता अ त्रिबंकराव पाबळे, नगरसेवक रमेश जाधव, प्रकार कमलकिशोर जोगदंडे, प्रकाश देशमुख, सोपान सपकाळ, पंजाब देशमुख, शेख सलीम इ उपस्थित होते.
Leave a comment