घनसावंगी तालुका काँग्रेसच्या वतीने मागणीचे बँकांना दिले निवेदन
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ येथील बँकांना ता.13 सोमवार रोजी शेतकर्यांना विना-अट पिककर्ज वाटप करा घनसावंगी तालुका काँग्रेसच्या वतीने मागणीचे बॉकांना निवेदन देण्यात आले. सध्या शेतकर्यांना शेतीच्या मशागतीस खते, फवारणी औषधी यासाठी शेतकर्यांना पैशाची आवश्यकता आहे म्हणून शेतकरी बांधवांनी आपणाकडे ऑनलाइन कर्ज मागणीसाठी नोंदणी केलेले आहे परंतु असे निदर्शनास आले आहे की आपल्याकडून शेतकर्यांना वेळोवेळी कागदपत्रे जसे की फेरफार नक्कल जुना सातबारा पिकपेरा पॅनकार्ड इतर बँकांची बेबाकी कर्जमाफी पावती अशा प्रकारच्या अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकर्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
जे की रिझर्व बँकेच्या कुठल्याही मार्गदर्शन तत्त्वांमध्ये नाही तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातबारा आठ अ फेरफार नक्कल स्वतः बँकेने तहसील कार्यालयाकडून घेणे आवश्यक आहे तरी बँकांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात येते सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशातच शेतकर्यांना हेलपाटे मारावे मारायचे करू नये. बँक प्रशासनाच्या वतीने शेतकर्यांना विना अट तात्काळ पिककर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस कडून शेतकरी बांधवा च्या वतीने करण्यात अली आहे निवेदनावर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुपंत कंटुले, रघुनाथ ताठे किसनराव सोळंके, शेख अली शेख बशीर, शरद कोकाटे, श्रीराम रंगनाथ कंटुले, शिवाजी लिहिणार राहुल कुमार शिंदे, भिमराव काळे शेतकर्यांच्या सह्या आहेत यावेळी कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक जांब समर्थ येथील कॅनरा बँक यांना निवेदन देण्यात आले आहे.
Leave a comment