बदनापूर । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षक शाळेवर येत नाही अशा तक्रारी असताना तालुक्यातील बुटेगाव येथील शाळेतील ध्येय वेडया शिक्षकांनी या लॉकडाऊनमध्ये शाळेत येऊन सर्व शाळा सॅनिटाईज तर केलीच उलट रंगीबेरंगी चित्रांचा वापर करून शाळेला एक नवे रूपच दिले. येथे आलो तर ही जिल्हा परिषदेची शाळा न वाटता एखाद्या कॉन्व्हेट स्कूलमध्ये आल्याचा भास व्हावा असे या शाळेचे नवे रूप या शिक्षकांनी केले.
बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथामिक शाळा आहे. मार्च महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शाळेला सुटया असताना या शाळेतील मुख्याध्यापक रघुनाथ वाघमारे यांनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करून शाळा विद्यार्थ्यांसाठी सुंदर व विद्यार्थीभिमुख कशी दिसेल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी आपली कल्पना गटशिक्षणिाकारी कडेलवार, केंद्रप्रमुख खिल्लारे, सरपंच महानंदा भास्कर गवारे, ग्रामसेवक पंकज ढाकणे, शालेय समितीचे अध्यक्ष राहुल पारखे यांच्यापुढे मांडल्यानंतर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी लॉकडाऊन काळात येऊन ही संपूर्ण शाळा सॅनिटाईझ करून सर्व भिंतीवर विविध म्हणी व चित्रे काढून तसेच आजूबाजूच्या व्हरांडा व इतर ठिकाणीही वेगवेगळी चित्रे काढून रंगवली या साठी त्यांना गावातील कृष्णा जगदाळे, राजू मांगडे, प्रल्हाड मांगडे, विजय गवारे, अशोक गवारे, द्रोणाचार्य नागवे, गणेश जाधव लक्ष्मी जाधव, सुरेखा आंधळे, शितल निकम यांनी मदत केली. जिल्हा परिषदेची ही शाळा सध्या सर्वत्र आकषर्णाचा बिंदू ठरलेली आहे.
Leave a comment