तहसीलदार सुमन मोरे व कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड यांनी केली पाहणी

मंठा । वार्ताहर

मंठा तालुक्यातील गुरवारी रात्री झालेल्या पावसात पाटोदा सर्कल मधील विडोळी , वाकडी , खारी , आर्डा व पाटोदा या गावातील काही भागात अतिवृष्टी झाली असुन यात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदार सुमन मोरे व कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड यांनी भेट देऊन पहाणी केली.

मंठा तालुक्यातील पाटोदा सर्कल मध्ये ता.9 गुरूवार रात्री झालेल्या पावसात तालुक्यातील मौजे विडोळी , वाकडी, पाटोदा , खारी , आर्डा या गावात अतिवृष्ठीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असुन मोठा आर्थिक फटका बसला आहे.बि-बियाणे खतासह मजुरीच्या खर्च हा शेतकर्‍यांच्या माथी पडला आहे. या पावसामुळे शेतात पेरलेले तुर , मुग , सोयाबीन व लागवड केली कपाशी वाहून गेली असल्याचे निवेदन  शेतकर्‍यांनी तहसीलदार यांना दिले आहे.  याबाबत मंठा तहसीलदार सुमन मोरे , तालुका कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड , तलाठी पी.डी.देशमुख व संजय उफाड व कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन प्रथम दर्शी पाहणी करून पंचनामा करण्यात येईल असे सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे भाऊसाहेब गोरे , गणेश चव्हाण , स्वप्निल भरदम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.