केज । वार्ताहर
विद्युत पोलवर आकडा टाकून वीजचोरी करणार्यानी आकडा काढल्याच्या कारणावरून लाईनमनला दगडाने मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली. शुक्रवारी रात्री 10.30 वाजता बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विडा येथील शरद सुरेश घुटे हे विद्युत महावितरण कंपनीच्या मस्साजोग येथील विद्युत उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे सहकारी सय्यद वहिदोद्दीन हे 10 एप्रिल रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास देवगाव येथील रोहित्र दुरुस्तीच्या कामासाठी घेऊन जाण्यासाठी विड्याच्या बस स्टँडवर आले होते. त्याचवेळी दत्तात्रय श्रीपतराव पटाईत हे त्यांच्याकडे आले आणि त्यांनी लाईनमन शरद घुटे यांना तु माझ्या घरचा लाईटचा आकडा का काढायला लावला ? असा प्रश्न करीत शिवीगाळ सुरु केली. त्यांचा मुलगा शुभम दत्तात्रय पटाईत हा पळत आला. त्या दोघा बापलेकांनी दगडाने व लाथाबुक्याने लाईनमन शरद घुटे यांना मारहाण केली. घुटे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय पटाईत, शुभम पटाईत या बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास फौजदार श्रीराम काळे हे करीत आहेत.
![](https://live.lokprashna.com/sites/default/files/styles/large/public/default_images/default1.jpg?itok=OSQcrnNN)
Leave a comment