उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत लोणीकर यांनी अधिकार्यांना खडसावले
कापूस खरेदी प्रकरणी प्रशासनाला लोणीकर यांनी धरले धारेवर, 15 दिवसात संपूर्ण कापूस खरेदी करण्याची केली सूचना
जालना । वार्ताहर
पेरणीचे दिवस संपले असून पेरण्यासाठी आवश्यक असणारे कर्ज शेतकर्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही किमान आतातरी पीक कर्जाचे तात्काळ वाटप करण्यात यावे अगोदरच बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणामुळे शेतकर्यावर दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट आलेला आहे परिणामी शेतकरी हतबल झाला असून त्याला खासगी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशा परिस्थितीत बँकांनी तात्काळ कर्ज वाटप करून आपापल्या बँकेला दिलेला लक्षण पूर्ण करावा अन्यथा होणार्या परिणामाला बँक प्रशासन जबाबदार राहील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी बँक प्रशासनाला खडसावले. परतुर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोणीकर यांनी बँकांनी दिलेल्या लक्ष्यांक पूर्ण करण्यासंदर्भात व तात्काळ कर्ज वाटप करून शेतकर्यांना दिलासा देण्यास संदर्भातील सूचना केल्या यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव परतूर तहसीलदार रूपा चित्रक परतुर सहाय्यक निबंधक वाघमारे मंठा सहाय्यक निबंधक श्रीमती खरात तालुकाध्यक्ष रमेश राव भापकर जिल्हा परिषद सदस्य राम माने, अशोकराव बरकुले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपले शहाजी राक्षे, दिगंबर मुजमुले, प्रविण सातकर, पद्माकर कवडे, शिवाजी भेंडाळकर यांची उपस्थिती होती.
यावेळी कापूस खरेदीबाबत देखील चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रशासनाकडून केवळ सीसीआय या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत कापसाची खरेदी करण्यात आले असून राज्य सरकारने खरेदी केलेली नाही परिणामी शेतकर्यांचा कापूस घरांमध्ये पडून आहे मंठा तालुक्यात साधारणता 35000 क्विंटल तर परतूर तालुक्यात 15 हजार क्विंटल पेक्षा अधिक कापूस शेतकर्यांच्या घरात पडून आहे पुढील पंधरा दिवसाच्या आत तो कापूस खरेदी न केल्यास होणार्या परिणामाला संबंधित प्रशासन जबाबदार असेल अशा शब्दात लोणीकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शेतकर्यांवर बोगस बियाणे वाटपामुळे मोठा संकटाला असून या संकटकाळी बँकेने आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे व बँकांनी आपला लक्ष्यांक पूर्ण करावा जेणेकरून शेतकर्यांना खाजगी सावकाराच्या दारात जाण्याची गरज पडणार नाही तर सहाय्यक निबंधक यांनी लक्षपूर्वक 15 दिवसाच्या आत शेतकर्यांकडे शिल्लक असलेला कापूस खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यावेळी लोणीकर यांनी केली.
Leave a comment