दिंद्रुड । वार्ताहर
बनावट पोलिस पास तयार करुन विक्री करणे तरुणाच्या अंगलट आले असून दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच असून संचारबंदी मध्ये जिल्हा अंतर्गत फिरण्याकरिता अत्यावशक सेवेसाठी बीड जिल्हा पोलिसांनी ऑनलाईन पास उपलब्ध केल्या आहेत परंतु अशा पास मधुन मोबाइल च्या सहाय्याने छेडछाड करत नाव व गाडी नंबर बदलत बेलुरा येथिल महेश अशोक फपाळ (21 ) हा तरुण बनावट पास बनवत 300 रुपयात विक्री करत होता. बेलुरा येथिल देसाई मोतीराम फपाळ यांना संशय आल्याने दिंद्रुड पोलिसात तक्रार करत सदर गुन्ह्याची माहिती दिली असता दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि आनिल गव्हाणकर यांनी सदर तरुणास तात्काळ अटक करत मोबाईल जप्त केला असुन आरोपी महेश अशोक फपाळ याने किती जणांना बनावट पास बनवुन दिला आहे याचा तपास करीत असल्याचे सांगितले.दरम्यान देसाई मोतीराम फपाळ याच्या फिर्यादीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment