नागरिकांसाठी कर्तव्य बजावणार्या पोलीसांचा केला सन्मान
गेवराई- वडवणी । वार्ताहर
कोरोनावर मात करण्यासाठी सध्या संचारबंदी सुरु आहे.पुर्णपणे लाँकडाऊन आहे. अशा स्थितीत पोलीस अधिकारी -कर्मचारी रात्रंदिवस जनतेसाठी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. शनिवारी वडवणी आणि गेवराई येथे पोलीसांनी रुट मार्च केला. याप्रसंगी नागरिकांनीही पोलीस दलाच्या कार्याचा सन्मान करत आपापल्या घरातून पोलीसांवर पुष्पवृष्टी करत टाळ्या वाजवून स्वयंप्रेरणेने त्यांचे अनोखे स्वागत केले. नागरिकांच्या या स्वागताने पोलीसही भारावले.
गेवराईत शनिवारी (दि.11) सांयकाळी साडे पाच वाजताशहरातील प्रमुख मार्गावरून उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च घेण्यात आला. यावेळी पोलिस ठाणे गेवराई येथील अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड व दंगल नियंत्रण प़थक उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांनी घराच्या छतावर व गॅलरीत उभे राहून पोलीसांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव गेवराई तालुक्यातील होवून नये यासाठी पोलिस यंत्रणा सक्रीय आहे. यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शहरातील नागरिकांनी पोलिसाचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
वडवणीत पोलीस बांधवांचे उत्साहात स्वागत
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र 24 तास ऑनडिवटीवर आसणारे महाराष्ट्र पोलीस राबत आहेत त्याचाच भाग म्हणून वडवणी शहारतील पोलीस सुध्दा आपले करतव्य चौक निभावताना दिसुन येत आहेत.प्रत्येक प्रभागात पोलीस बांधव फिरतांना दिसत असल्याने काल त्यांच्यावर वडवणी शहरातील प्रत्येक प्रभागातील महिला पुरुष यानीं पुष्पवृष्टी करण्यात आली.
वडवणी शहर पुर्णत लॉक डाऊन आसुन सध्या पोलीस बांधवपुर्ण शहरात रात्रन दिवस बंदोबस्त करताना दिसत आहेत नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये या करीता आवाहन करीत आहेत व नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभे आहेत. हे पोलीस बांधव आपल्या बंदोबस्ता साठी आपल्या पुर्ण सुट्या रद्द करून 24 तास राबत आहेत. प्रत्येक प्रभागात पोलीस बांधव फिरतांना दिसत असल्याने काल त्यांच्यावर वडवणी शहरातील प्रत्येक प्रभागातील महिला-पुरुषांनी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ठाण्याचे निरीक्षक महेशकुमार टाक यांच्यासोबत उपनिरीक्षक गव्हाणे, उपनिरीक्षक परदेशी, सहाय्यक उपनिरीक्षक शिंदे, पोलीस नाईक मनोज जोगदंड, संजय राठोड, गंगावणे, आशेफ शेख, आघाव, मुंडे, संजय राठोड, बारगजे, वाघमारे माने मॅडम, वाघमारे मॅडम, साळवे मॅडम, काटकर मॅडम, आदी कर्मचारी यांनी शहराचे आभार मानत घरातच राहुन आम्हा पोलीस प्रशासनास सहकार्य करा आसे वडवणी ठाण्याचे निरीक्षक महेश टाक यांनी केले आहे.
Leave a comment