माजलगाव :कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता आणि पोलीस यंत्रणा चे काम पाहता शहर व ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी वर्गा करिता डी वाय एस पी श्रीकांत ढिसले यांच्या कल्पकतेतून निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली.आजपासून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभारल्या गेलेल्या या( बॉडी डिसीन्फेक्शन टूनल) निर्जंतुकीकरण कक्षाची सुरुवात झाली.
माजलगाव शहर, ग्रामीण व उपविभागीय कार्यालय अंतर्गत सुमारे 100 कर्मचारी व अधिकारी सध्या कोविड 19 च्या प्रादुर्भाव ला तोंड देण्यासाठी रात्रदिवस रस्त्यावर असून आज ही सर्व सामान्य माणसांशी सर्वाधिक सम्पर्क पोलीस यंत्रणेचा येत आहे.पोलीस आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे.पोलीस दलाचे कोविड 19 पासून सरंक्षण व्हावे या दृष्टीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढिसले यांनी केसापुरी येथील पोलीस क्वार्टर च्या प्रवेश स्थानी सुसज्ज असे निर्जंतुकीकरण कक्ष उभारले आहे.आपले कर्तव्य बजावून आल्या नंतर ड्रेस,शस्त्र,मोबाईल नेमप्लेट सह प्रत्येक अधिकारी व पोलीस स्वतःच निर्जंतुकीकरण घेऊन कोरोना ला रोखू शकतो.निर्जंतुकीकरण करण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक सामग्री चा वापर करून हे कक्ष उभारण्यात आले आहे.
Leave a comment