बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी “ आरोग्य सेतू “ हे मोबाईल अँप डाऊनलोड करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हावासियांना केले आहे.
भारत सरकारने कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी “ आरोग्य सेतू “ हे मोबाईल अँप लाँच केले आहे.या अँपच्या माध्यमातून वापरकर्ता त्याच्या जवळपास करोनाबाधित रुग्ण आहे कि नाही याची माहिती घेवू शकतो. आरोग्य सेतू हे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-19 ट्रॅकिंग अॅप आहे. तसेच आरोग्य सेतू अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. वापरकर्त्याच्या मोबाईल फोनची रिअल टाईम लोकेशन जीपीएसद्वारे ट्रॅक करण्यात येतं. त्यामुळे हे अॅप गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोनाबाधित असल्यास युजर्सना सतर्क करते.तसेच हे अँप ब्लूटूथच्या माध्यमातून वापरकर्ता करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आहे कि नाही, हे तपासता येते. तसेच त्याच्यामध्ये किती अंतर आहे याची माहिती मिळते. तसेच या अँप्सवर कोविड १९ पासून आपण कसे वाचू शकतो या संदर्भात अधावत माहिती मिळत राहते. आरोग्य सेतू अॅप युजर्सना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी संबंधित इतरही सल्ले देणार आहे. यामध्ये वापरकर्तासाठी एक chatbox आहे, जो वापरकर्त्यांना या व्हायरस संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देतो,तसेच वापरकर्त्यांला या व्हायरसची लक्षणे आहेत कि नाही याची माहिती दिलेल्या प्रश्नावली मार्फत सांगितली जाते.यामध्ये देशातील महत्वाच्या मदतक्रमांकाची माहिती देखील प्राप्त करून घेता येते. आरोग्य सेतू अॅप हे 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि तमिळ भाषांसोबत इतर भाषांचा समावेश आहे. सध्या हे अॅप अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अॅप गुगल प्ले आणि अॅपल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. खालील दिलेल्या लिंक वरून एप इंस्टॉल करावे. Android मोबाईलधारक खालील लिंकचा वापर करून डाऊनलोड करू शकतात. https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu iOS: अॅपल मोबाईलधारक खालील लिंकचा वापर करून डाऊनलोड करू शकतात. https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357 कोरोनाबाबत बीड जिल्हावासी सतर्क, जागृत आणि सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य सेतू अॅपचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
Leave a comment