कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका डॉक्टरांचा कोराना संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी औरंगाबाद येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये दु:खात निधन झाले. कुंभार पिंपळगावातील दुसर्या दिवशी त्यांच्या संपर्कातील आठ व्याक्तीना क्वॉरंटाईन करण्यात आले होते .त्यात त्यांच्या दवाखाण्यातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव आले व 6 जनांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
नंतर पुर्ण गाव आठ दिवस बंद करून दवाखाना व परिसर कनटेनमेंट झोन जाहिर करून आझाद नगर झोपडपट्टी संपुर्ण परिसर सिल करण्यात आला व तिसर्या दिवशी दोन जन पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कांतील कुंभार पिंपळगावातील 11. जनांना पुन्हा क्वारांटाईन केले होते. त्यांचा रिपोर्ट ता.6 जुलै राजी आला असून त्यातील 11 पैकी. 11 जन निगेटिव्ह आले असून कुंभार पिंपळगावची भिती कमी झाली असली तरी तालुक्याची भिती कायम असून घनसावंगीत नविन तीन पॉझिटिव्ह रूग्ण आले त्यात 40 वर्ष पुरुष , 29 वर्ष स्त्री, व 8 वर्षाच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगाव कर यांनी दिली आहे.
Leave a comment