सर्व समाज बांधवांचा समावेश

परतूर । वार्ताहर

नवविवाहित तरुणीला भरदिवसा बाजार पेठेत एका नराधमाने धारधार शस्त्राने मारून तिचा खून केला. मंठा शहरात मानवजातीला काळीमा फासणारी दुःखद घटना घडल्याने सदरील घटनेचा निषेध व्यक्त करत वरफळ गावात कडकडीत बंद पाळून  समस्त वरफळवासियांनी श्रद्धांजली अर्पण केली.

या घटनेचा निषेध करून बागेश्वरी साखर कारखाना चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मंठा शहरात झालेली घटना ही मानवजातीला काळीमा फासणारी असून अशा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच मयत नवविवाहितेच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासात अटक केली  मात्र यापुढे महिलावर असा अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी असे ही मत व्यक्त करण्यात आले. यावेळी गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.