मंठा । वार्ताहर
दिवंगत वैष्णवी गोरे या नवविवाहित तरुणीची झालेली हत्या मानवतेला काळीमा ङ्गासणारी असून वैष्णवी ला न्याय मिळवून देण्यासाठी व त्या नराधमाला ङ्गाशीची शिक्षा होण्यासाठी आपण शासन व प्रशासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे यांनी आज स्पष्ट केले आमदार अतुल सावे यांनी आज मंठा येथे दिवंगत वैष्णवी गोरे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ राजेश मोरे पंजाब बोराडे विठ्ठल काळे प्रसादराव बोराडे मुस्तङ्गा पठान माऊली गोंडगे नारायण बागल विठ्ठल गोंडगे अरुण खराबे बाळासाहेब तौर दिनेश सराङ्ग रामा दहातोंडे नारायण दवणे सचिन राठोड जानकीराम चव्हाण कपिल तिवारी पांडुरंग चव्हाळ वैभव नरवडे अरुण खवणे सतीश मोरे लक्ष्मण बोराडे द्वारकादास चिंचणे कैलास चव्हाण किशोर हानवते कांतराव जाधव यांची उपस्थिती होती दिवंगत वैष्णवी गोरे यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले असून शेख अश्पाक शेख बाबू या नराधमाला तात्काळ ङ्गाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जनभावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी ङ्गडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून सरकारच्या स्तरावर हे प्रकरण उचलून धरले जाणार आहे व दिवंगत वैष्णवी गोरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही यावेळी आमदार अतुल सावे यांनी स्पष्ट केले लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश दिवंगत वैष्णवी गोरे यांचा खटला ङ्गास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विट दिवंगत वैष्णवी गोरे यांचा खटला ङ्गास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व त्यासाठी प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांची सरकारी पक्षाच्या वतीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली होती या मागणीला यश आले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट द्वारे मंठा हत्याकांडातील दिवंगत वैष्णवी गोरे यांचा खटला ङ्गास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवला जाणार असल्याची माहिती दिली ङ्गास्ट ट्रॅक कोर्ट बरोबरच आता प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांची याप्रकरणी शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी लोणीकर यांनी केली होती या मागणीकडे महाराष्ट्र सरकार लक्ष देते की दुर्लक्ष करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment