जालना । वार्ताहर
मंठा येथील वैष्णवी गोरे यांच्या हत्या प्रकरणातील पिडित कुटुंबीयांस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदाधिकार्यांनी भेट देऊन ङ्गास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी यासाठी मंठा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
नवविवाहित तरुणी वैष्णवी गोरे ची निर्घृण हत्या झाल्या प्रकरणी या प्रकरणाची ङ्गास्ट ट्रॅक व विशेष सरकारी वकील यांचे मार्ङ्गत खटला चालवावा व आरोपीस तात्काळ ङ्गाशीची शिक्षा व्हावी या साठी वंचित बहुजन महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी पीडितेच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली व मंठा येथील पोलीस स्टेशन ला जाऊन पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली व निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके , सविताताई मुंढे,ड. अशोक खरात,चोखाजी सौंदर्य, विष्णु शेळके, सुमनताई शेळके,शिवाजी डोळस, डॉ ि्कशो त्रिभुवन, भारत उघडे,रोहन वाघमारे,राहुल नाटकर,हानुमंत मोरे, प्रभाकर प्रधान जयपाल भालके,गुलाब बचाटे, संतोष आढाव,सुभाष साबळे, सचिन पट्टेकर, दिपक मोरे यांच्यासह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment