बदनापूर । वार्ताहर

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे सावट असतानाच तालुक्यासाठी जीवनदाहिनी असलेले सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्पात मागील दहा ते बारा वर्षानंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जवळपास दोन ङ्गूट पाणीसाठा झाला असून पाण्याची आवक वाढत चाललेली असल्यामुळे या धरणावरच या तालुक्याचे सिंचन व पाणी पुरवठा अवलंबून असल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दुधना नदीवर निम्न दुधना प्रकल्प आहे. 

या प्रकल्पावरच बदनापूर तालुक्यातील शेती अवलंबून असते. हा प्रकल्प पूर्णपणे भरल्यास बदनापूर तालुक्यातील मोठया प्रमाणात पिण्याचा पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्‍न सुटतो. जर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास या कालव्याद्वारे जवळपास 15 किलोमीटर असलेल्या अंबडगावपर्यंत पाणी जात असल्यामुळे मोठया प्रमाणात शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न निकाली निघतो. मागील कित्येक वर्षापासून हा प्रकल्प भरलेलाच नाही. मागील पाच ते सात वर्षापासून या प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा रहात आलेला आहे. यंदा मात्र तालुक्यात मृग नक्षत्रापासून पावसाने बरसात सुरू केलली आहे. तालुक्यातील काही मंडळात तर अतिवृष्टी होऊन कित्येक शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून निघाल्यामुळे शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे असतानाच बदनापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातही मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. मागील दहा ते बारा वर्षानंतर पहिल्यांदा या प्रकल्पात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास दोन ङ्गूट पाण्याची आवक झालेली आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 15 ङ्गूट असून अशीच आवक राहिल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार आहे. सोमठाणा धरणात पाणी साठा नसल्यामुळे मागील एक ते दोन वर्षात विविध सामाजिक संघटना व महसूल प्रशासनाने जवळपास 5 हजार ब्रास गाळ या धरणातून काढल्यामुळे यंदा पाणी साठयातही वाढत होणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.