जालना । वार्ताहर
मंठा येथील वैष्णवी नारायण गोरे या निष्पाप तरुणीच्या हत्येप्रकरणी मंठा शहरातीलच एका माथेङ्गिरू गुंड प्रवृत्तीच्या नराधमाने रस्त्यावर पाठलाग केला व गळ्यावर सपासप वार करुन दिवसाढवळ्या निर्घृणपणे खून केला. या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भगवान सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र राख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, पिडीत मुलीची आई अशामती मजुरी तर वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. अत्यंत गरीब असणारे ह्या कुटुंबाची कन्या असलेल्या वैष्णवी नारायण गोरे हिची मंठा शहरातीलच एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा सातत्याने छेड काढून त्रास देत होता. बदनामी नको व गुंड प्रवृत्तीला घाबरून आई-वडिलांनी वैष्णवीची अगोदर शाळा बंद केली व पाच दिवसापूर्वी तिचा विवाह करुन दिला. परंतु माहेरी आलेल्या वैष्णवीला रस्त्यात गाठून विकृत मानसिकतेच्या या मुलाने तिची अमानुषपणे निर्घृण हत्या केली. वैष्णवीची आई घडलेल्या हत्येचा हृदयविदारक प्रसंग कथन करीत होती त्यामुळे वातावरण अत्यंत भावुक झाले होते. ङ्गया नवविवाहितेच्या झालेल्या हत्येचा तपास अत्यंत योग्य पद्धतीने करून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या शिष्टमंडळाने उपरोक्त अधिकार्यांकडे करतांनाच मंठा येथील वरील विषयानुसार घडलेला प्रकार हा मानुसकीला काळीमा ङ्गासनारी आहे. या प्रकरणात लवकरात लवकर आरोपी विरुध दोषारोप पत्र दाखल कराव, ङ्गास्टट्रॅक कोर्टात प्रकरण लावण्यात यावे, विषेश सरकारी वकील म्हणुन अॅड. उज्वल निक्कम यांची नियुक्ती करण्यात यावी, पिडीतेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात भगवान सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेद्र राख, संजय कोळब़ांडे, भाऊसाहेब घुगे, गजानन गिते, सुहास मुंढे, डॉ. देवराव चौरे, गजानन माने आदींचा समावेश होता.
Leave a comment