भोकरदन । वार्ताहर
येथील गाळेभाडेकरू शिष्टमंडळाने गाळेमालक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची भेट घेऊन आम्हाला कोरोणाच्या लॉकडाऊन काळातील गाळेभाड्यामध्ये काही प्रमाणात सवलत मिळावी अशी विनंती केली या वेळी राजाभाऊ देशमुख म्हणाले की कोरोणा ही जागतिक महामारी असुन भारतासह अनेक देशाला याचा ङ्गटका बसला असून याचा परिणाम भारतामध्ये उदोगपती पासुन छोटे दुकानदार यांना बसला असून सर्वांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे याची मला पुर्णपणे जाणीव आहे.
या संकटाच्या काळात मी सदैव तुम्हच्या सोबत आहे मी या संकटात तुम्हाला हातभार लावण्यासाठी एक महिन्याचे मासिक भाडे माङ्ग करतो व शहरातील गाळेमालकांना विनंती करतो की आपण आपल्या परीने आपल्या भाडेकरूची कशी मदत करता येईल असे आवाहन करतो यावेळी शिष्टमंडळाने गाळेमालक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा एक महिन्याचे मासिक भाडे माङ्ग केल्याबद्दल सत्कार केला राजाभाऊ देशमुख यांच्या मालकीचे श्री गणपती कॉप्मलेक्स जालना रोड भोकरदन, एस बी आय बँक खालील गाळे, डॉ आंबेडकर चौकातील गाळे, व यासह सिल्लोड रोड वरील गाळेभाडेकरू अंदाजे 52 जनाचे एक महिन्याचे मासिक भाडे माङ्ग करण्यात आले आहे या शिष्टमंडळात यश इंटरनेट कॅङ्गेचे अमोल मगरे,वैभव मेन्स पार्लरचे ङ्गकीरा सुरडकर, व्लासिक मो शॉपीचे इम्रान खान, श्री स्वामी समर्थ चे कैलास पैठणकर, राधिका लेडीज कॉर्नरचे शुभम शेटे, भारत सायकलचे शालिकराम पाबळे, शांताई इलेक्ट्रॉनिकचे गजानन बुरंगे, पतंजली आरोग्य केंद्रचे पालोदे, लक्ष्मी ड्रेसचे छगनराव दळवी, श्री गणेश कलेक्शनचे रामेश्वर सोनवणे,पुणेरी वडापाव किशोर पवार यांच्यासह गटनेते संतोष अन्नदाते, रमेश जाधव, संजय शास्ञी,सोपान सपकाळ, गौरव देशमुख, यांची उपस्थिती होती.
Leave a comment