तलवाडा । वार्ताहर
गेवराई तालुक्यात तलवाडा व परिसरात गंगावाडी व राजापुरातील साठ्याच्या वाळुला सोन्यापेक्षाही मोठा भाव आला आहे. या परिसरात खुलेआम अवैध वाळुची विक्री करण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली पोलिस महसुलच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत असून वाळू माफियावर कार्यवाही कोण करणार असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन वाळु माफियावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाळू माफियांमुळे गोदाकाठ बदनाम झालेला आहे. गंगावाडी व राजापुर व तलवाडा गावाशेजारी आनेक अवैध वाळुचे मोठ मोठी साठे निर्मान झालेले आसतांना हे साठे वाळुमाफियांना मदत करनारे म्हसुल व पोलिस यांच्यामुळ निर्मान झालेले असताना सध्या गोदावरी तुडूंब भरलेली आसल्यांने साठ्याच्या वाळुला मोठ्या प्रमानात भाव आलेला आहे. तलवाडा व परिसरात मोठमोठे आसलेल्या साठ्याती वाळु राजरोज तलवाडा व परिसरात दिवसा विक्री होत आसतांना पोलिस व म्हसुलंने डोळे झाक केलेल दिसत आहेत कारन वाळूतून लाखोची उलाढाल होत असतांना आर्थीक मायापोटी कारण फक्त कोरांनांच पुढे करन्यात येत असतांना सामान्यावर हात उचलणारे पोलिस कारवाई करत नसल्यामुळे वाळू माफियांना सोन्याचे दिवस आले आहेत. जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन या टिकाणी कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
----------
Leave a comment