बीड । वार्ताहर
बँकांत होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी बँकांनी टोकन पद्धतीचा अवलंब करावा किंवा बँक शाखेवर प्रत्येक दिवशी जेवढ्या ग्राहकांना सेवा देता येऊ शकते, तेवढ्याच संख्येने आपल्या बँकेच्या बाहेर उभे राहण्यासाठी एक मीटरपेक्षा जास्त अंतरराने परमनंट मार्किंग करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत गर्दीचे नियंत्रण करून सामाजिक आंतर राखणे आवश्यक आहे बँकेने दिलेल्या सूचनांचा अवलंब करून सामाजिक अंतराचे पालन होईल व कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची ग्राहकांनी दक्षता घ्यावी याकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांना जिल्हाधिकारी रेखावार यांनी निर्देशीत केले आहे विविध बँकांच्या समोर ठराविक वेळेत होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी बँकांनी टोकन पद्धतीचा अवलंब करावा किंवा बँक शाखेवर प्रत्येक दिवशी जेवढ्या ग्राहकांना सेवा देता येऊ शकते . तेवढ्याच संख्येने आपल्या बँकेच्या बाहेर एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवून परमनंट मार्किंग करून घ्यावी ग्राहक यावर उभे राहतील याची खात्री करावी. यासाठी बँकस्तरावरून सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी सुरक्षारक्षक यांनी ग्राहक शाखेमध्ये येण्यापूर्वी उपस्थित राहून ग्राहकांना आखणी करून दिलेल्या वर्तुळामध्ये उभे राहण्यासाठी सूचित करावे.
आखणी करून दिलेल्या सर्व जागा भरल्यानंतर प्रवेश देण्यात येऊ नये अशाप्रकारे बँकांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करावे.प्रत्येक शाखेसमोर फलक लावून आपण केलेल्या व्यवस्थेबाबत ग्राहकांना अवगत करावे त्यामुळे व ग्राहकांमध्ये झालेले गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने देखील फलक लावावेत.फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 व 300 उल्लंघन होणार नाही याची दक्षता ग्राहकांनी घ्यावी .अन्यथा भारतीय दंड संहिता 1860 (45 ) कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मांडण्यात येईल तसेच इतर कलमा सह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे सूचित केले आहे.
Leave a comment