जालना । वार्ताहर

जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी ङ्गौजदारी प्रकीया संहिता 1973 च्या कलम 144 (1)(3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधीत तरतूदी अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण जालना नगर परिषद हद्दीत (औद्योगीक वसाहत क्षेत्र वगळून) दिनांक 5 जूलै 2020 च्या रात्री 12.00 वाजेपासून ते दिनांक 15 जूलै 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केले  आहे. या कालावधीत नागरीकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली असुन या कालावधीत खालील नियम व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा सूरू राहतील. जालना शहरात विशेष परवानगीशिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही. सर्व शासकीय कार्यालये व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरू राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील.अ) जालना शहरातील सर्व बँकेचे कर्मचारी केवळ अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी बँकेचे  ओळखपत्र वापरून कामकाज करू शकतील. कोणत्याही ग्राहकाला बँकेत येण्यास प्रतिबंध  राहील.मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांना न्यायालयीन कामकाजासाठी परवानगी राहील.जालना शहरातील नागरीकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी वैद्यकीय कारण किंवा अत्ंयविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी .19.. या संकेतस्थळावर अर्ज करावा.

जालना शहरातील सर्व नागरीकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्‍वसनास त्रास,इ.) लक्षणे आढळून आल्यास सदरील अ‍ॅपमध्ये या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी. तसेच वरील कालावधीत संचारबंधीचे पालन करावे.ङ्गिरते दुध विक्रेते यांच्या मार्ङ्गत घरपोच दुध,  दुधांची पाकीटांची विक्री, वितरण करता येईल परंतू एका ठिकाणी उभे राहून दुध विक्री करता येणार नाही. घरपोच वाटपाच्यावेळी कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजीक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते 9.30 राहील जार वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांडयांमध्ये पाणी द्यावे आणि त्यावेळेस कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजीक अंतराचे पालन करावे किंवा जार वॉटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी तसेच सर्व वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्रा आधारे परवानगी राहील. घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेष परिधान करावा व त्यांचे गणवेष नसलेल्या कर्मचारी यांनी नियमानूसार पास काढून घरपोच सेवा द्यावी.विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी व वाहनांना ओळखपत्र आधारे परवानगी राहील. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र किंवा ऑनलाईन पासद्वारेच जालना शहराअंतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे.अत्यंविधीसाठी शासनाचे आदेशात नमुद केल्यानूसार नियमाप्रमाणे परवानगी असेल.सर्व प्रकारची मालवाहतूक व त्यानुषंगाने जालना शहराच्या हद्दीत गोदामे चालवण्यास परवागी देण्यात येत आहे. त्यानुषंगाने त्या आस्थापनांनी हमालांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावीत.पेट्रोल व डिझेल पंप ङ्गक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणा-या कर्मचा-यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांनासाठीच सूरू राहील. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.