केज । वार्ताहर
तुम्ही गावकर्यांनी आम्हा परजिल्ह्यातील लोकांना रस्त्यात लाकडे आडवी टाकून गावबंदी का केली? असे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यतील आठ लोकांनी जिल्हा बंदीचा आदेश धुडकावून बीड जिल्हा हद्दीत येऊन केज तालुक्यातील लाखा या गावात येऊन दोघांना लाकडी दांड्याने मारहाण करून एकाचे डोके फोडले. तालुक्यातील लाखा येथे दि.10 एप्रिल रोजी सायंकाळी 7:00 वा. सुमारास ही घटना घडली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील युसुफ महेबुब शेख, ताहेर युसुफ शेख, शाहेद युसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चारजण यांनी जिल्हा बंदीचा व कोरोना साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश डावलून दोन चारचाकी वाहने व दुचाकीवरून बीड जिल्हा हद्दीत प्रवेश केला. बीड जिल्हा हद्दीतील लाखा येथील गावकर्यांनी चेकपोस्ट तयार करून तुम्ही बाहेर जिल्ह्यातील लोकांना का प्रवेश नाकारला? असे म्हणून ताहेर शाकेर पठाण (23) व अन्य एकास लाखा शिवारात परसुराम रावसाहेब घाडगे यांचे शेताजवळ रस्त्यावर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडके मारुन डोके फोडुन दुखापत केली.ज ीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी फिर्यादी ताहेर शाकेर पठाण यांच्या फिर्यादीवरून युसुफ महेबुब शेख, ताहेर युसुफ शेख, शाहेद युसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चार (सर्व रा. शिराढोण ता.उस्मानाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अमोल गायकवाड ्रतपास करीत आहेत.दरम्यान लाखा ग्रामपंचायतीने यातील आरोपींनी कोव्हिड-19 साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून रोगाची भीती दाखविली. याची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.
Leave a comment