पेट्रोल-डिझेलचे वाढते दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या-विष्णु कंटुले
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील काँग्रेस कमेटीच्या वतीने ता. 3 जुलै शुक्रवार रोजी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुपंत सदाशिवराव कंटुले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शासनाकडे तहसीलदार यांना निवेदन देऊन दरवाढ कमी करण्यात यावी म्हणून मागणी केली आहे. जग सध्या कोरोनाच्या महामारी ने त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांचा रोजगार हिरवला आहे .उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे अशा या दुहेरी संकटात कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे शेतकर्यांचा शेती उपयोगी बाजारपेठेतील सर्व माल वाहतुकी-ट्रान्सपोर्ट चे भाडे वाढ होत आहे. त्यामुळे याचा ङ्गटका सर्वसामान्य जनतेला बसत असून महागाईची आणखीन एका खाईत लोटले जात असून जनतेवर एक संकट ओढवले जात आहे.
या दुहेरी संकटाचा सामना करताना जनतेची तारांबळ उडत आहे दिनांक 7 सात जून दोन हजार वीस 2020 पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. शनिवार पर्यंत ही दरवाढ पहाता पेट्रोल मध्ये प्रति लिटर नऊ पॉईंट 9 . 12 तर डिझेल मध्ये 11.01 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे .देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर 87-88 रुपयाच्या पुढे गेल्या आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा महाग आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट ङ्गायदा सामान्य जनतेला दिला जात नाही .वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असतात .सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही . सन 2014 मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे नऊ पॉईंट चाळीस रुपये 9.40 रू ते डिझेलवर 3.56 छप्पण रुपये होते सध्या हेच शुल्क पेट्रोल वर 32.98 रुपये तर डिझेलवर 31.83 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या या किमती कमी सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे तरी सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालून दिलासा द्यावा ही विनंती काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
Leave a comment