कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील अधिक ग्रामपंचायत मधून अपंगानसाठी शासनाने नुकताच जाहीर केलेला 5 % पाच टक्के निधी वाटप करण्यात आलेला नसून जिल्हाभरात अपंगाच्या पगाराही होत नसल्याने अपंगान वर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना महामारी च्या संकटात अनेक गोरगरीब ,मंजुर ,महिनदारी करणार्या अपंग कुटुंबातील लोकांच्या हाताला काम धंदा नाही अनेक कुटुंब प्रमुख अपंग आहेत कोणते उद्योग धंदे सुरू नाहीत .अपंगाची पगार व्हायला तयार नाही. जिल्हा अधिकार्यांनी याकडे लक्ष घालून अपंगाचा पगार तात्काळ वाटप करण्यात यावा अशी मागणी दिलेल्या प्रसिद्धीपत्रका व्दारे राष्ट्रवादी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मुन्ना दायमा यांनी केली आहे अपंगांवर उपासमारीची वेळ आली आहे पगार लवकरात लवकर करा नसता जिल्हाभर आंदोलन करू मुन्ना दायमा राष्ट्रवादी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले आहे.
Leave a comment