*
माजलगाव (प्रतिनिधी ) कोरोना या जागतिक महामारी चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येथील तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेने अकरा लाख रुपयाचा निधी माजलगाव चे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार आदरनिय प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ व संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ संचालक सुशिलजी डक यांनी उपविभागीय दंडाधिकारी शोभा ठाकूर यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की कोरोना हा विषाणू संपूर्ण भारतात पाय पसरू लागला असून महाराष्ट्रात ही या विषाणू ने अनेकांचा बळी घेतला असून अनेकांना याची लागण झाली आहे. या कोरोणा विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकारी संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे व सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील सर्व सहकारी संस्थांना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेने माजलगाव चे आमदार प्रकाशदादा सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी अकरा लाख रुपयाचा धनादेश माजलगावच्या उपविभागीय दंडाधिकारी शोभा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी अर्बन चे यानिमित्ताने अनेकांनी अभिनंदन केले आहे. या वेळी कृषी उच्चतम बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक व पंचायत समितीचे माजी सभापती जयदत्त आण्णा नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a comment