-
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तसेच आष्टी तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आ. सुरेश धस तसेच त्यांच्या आदेशाने आम्ही सर्व कार्यकर्ते काम करीत आहोत.कड्यात आ. सुरेश धस यांनी पुढाकार घेत सर्व नागरिकांना मास्क वाटप करण्यात येत आहे. मास्क वाटप करण्याची जबाबदारी प्रत्येक वार्ड मधील सदस्य व सरपंच करत आहेत.
आ.सुरेश धस यांच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमार्फत हे मास्क वाटप करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेत मास्क वापरा, वारंवार साबण लावून हात धुणे, हस्तांदोलन करू नका, संसर्ग टाळा, गरज असेल तर घराच्या बाहेर पडा.असे आवाहन देखील आ.सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील नागरिकांना करून प्रत्येक गावातील गट- गण प्रामुख्याकडे मास्क दिले आहेत. गट-गण मार्फत प्रत्येक गावात घर प्रमुखाला हे वाटप झाले आहेत. मास्कसोबतच सूचना देखील देण्यात आल्या.त्याच बरोबर २४ तास कोरोना आजारीसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर,पोलीस कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी यांना काळजी घेण्याचे आव्हान आ.सुरेश धस यांच्या वतीने केले असून सदरील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले आहे असे सरपंच अनिल ढोबळे यांनी सांगितले.यावेळी सर्व वार्डात ग्रामपंचायत सदस्य मास्क करीत आहेत.
Leave a comment