परतूर । वार्ताहर
मंठा शहरातील एका नवविवाहित मुलीला दि. 30 रोजी भरदिवसा बाजारात धारदार शस्त्राने जीवे मारण्यात आले. मानव जातीला काळीमा ङ्गासणारी दुःखद घटना घडली. या प्रकरणी परतूर शहर सामाजीक संघटनाच्या वतीने 2 जुलै रोजी बाजारपेठ बंद करण्यात आले. सदरील घटनेचा हिंदू समाज, अखिल भारतीय समता परिषद, व सावता परिषदसह सामाजिक हिंदू संघटनानी जाहिर निषेध नोंदवून आरोपीला ङ्गाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवविवाहित तरूणीस श्रध्दांजली अर्पण करून निषेध केला. पोलिस प्रशासनाने अवघ्या पाच तासात आपल्या तपासाचे सुत्र हलवुन आरोपीस जेरबंद केले आहे. आपले कर्तव्य पार पाडले आहे परंतू आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदरील मुलीच्या घरच्यांना पोलिस सुरक्षा देण्यात यावी. व समाजामध्ये महिलांवरील अत्याचार होणार नाहीत यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. आरोपीने केलेला गुन्हा मानवीय समाजाला काळीमा ङ्गासणारी असल्यामुळे आरोपीला जामीन मिळू नये. या गुन्ह्याचा खटला ङ्गास्टट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी करण्यात यावी व आरोपी शेख अल्ताङ्ग बाबु कठोर ङ्गाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी जेणे करून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना चाप बसेल अशी मागणी करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Leave a comment