गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची मदत पोहोचली समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत !
परळी दि. ११ ---- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरात वाटप करण्यात आलेले रेशन व इतर जीवनावश्यक वस्तू समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचविण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम पूर्वक केले. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे या माध्यमातून गोरगरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हातावर पोट असणा-या रोजंदारी कामगारांचा रोजगार बंद झाला आहे. गोरगरीब जनतेला होणारा त्रास आणि त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेवून पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील गोरगरीब जनतेला रेशन तसेच जीवनावश्यक वस्तू वितरित केल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हे रेशन समाजातील शेवटच्या घटकांपर्यत घरोघरी जाऊन पोहोचविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंकजाताई मुंडे यांचा दिलासा
-----------------------------
समाजातील गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार, सफाई कामगार यांच्या बरोबरच सध्या कोरोनापासून लोकांना वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी, चोवीस तास जनतेच्या संरक्षणासाठी तैनात असणारे सुरक्षा कर्मचारी, मंदिरातील पुजारी, निराधार, विधवा, परितक्त्या महिला या सर्वापर्यत रेशन पोहोचवून पंकजाताई मुंडे यांनी त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले आहे.
Leave a comment