कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील डॉक्टरचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीदायक दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिक भयभीत झाले आहे . गुरुवारी सकाळी पासूनच आरोग्य विभागाकडून संर्वैक्षण केले जात असून घाबरून जाऊ नका काळजी घ्या असा संदेश देण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने जनजागृती केली असून घरात राहण्याची आव्हान केले आहे.व दवाखाने व औषधी दुकाने वगळता संर्पुंण बाजार पेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामपंचायतने कुंभार पिंपळगावसह परिसरातील संपर्कात आलेल्या लोकांची यादी प्रसिद्ध केली होती .मृत्यु झालेल्या त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या आठ 8 व्यक्तींचा गुरुवारी सकाळी अहवाल प्राप्त झाला त्यात त्यांचे 2 दोन कर्मचारी पॉझिटिव व 6 सहा व्यक्तींचे रिपोर्ट निगेव्हटिव आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.रिपोर्ट येताच गावात सगळीकडे खळबळ उडाली असून गुरुवारी सकाळ पासूनच आरोग्य विभाग कुंभार पिंपळगाव व आरोग्य विभाग घनसावंगी यांनी नविन 2 पॉझिटिव आलेल्या व्यक्तीच्या संर्पकातील 11 व्याक्तीना घनसावंगी येथील अलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे.व 20 जनांना होम क्वारंटाईन राहण्याच्या कडक सूचना केल्या आहेत.नवीन क्वारंटाई केलेल्या लोकांचा अहवाल आल्या नंतर पुढील संर्पकात आलेल्या व्याक्तीना क्वारंटाईनची कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागा कडून सांगण्यात आले.
Leave a comment