कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरखेड येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रेला पहिल्यांदाच खंड पडला असून काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला प्रतिपंढरपूर म्हणून पिंपरखेड येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जालना जिल्हाभरातून तर परिसरातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी गर्दी होत असते , मोठे पंढरपुर तर वाटले पंढरपुरी म्हणजे पिंपरखेड येथे या वर्षी प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त गावात एवढा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पांडुरंगाची महापूजा येथील सरपंच सौ.सुनिता अशोकराव आघाव यांच्या हस्ते पाहाटे पांडुरंगाची महापूजा करण्यात आली. तसेच कुंभार पिंपळगाव येथील पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चे पुजारी तुकाराम पर्वत यांनी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंनसिग पाळून सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची महापूजा करून आरती करण्यात आली. श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे आषाढी एकादशी निमित्त समर्थ ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी (दिं.01 ) बुधवारी श्रीराम , समर्थ मंदिर व समर्थ ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत काकड आरती करण्यात आली, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियनांचे पालन करण्यात आले या वर्षी मंदिराचे दरवाजे बंद होते.परंतू दरवर्षी प्रमाणे मंदिरात श्रीं ची पुजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला व आषाढी एकादशी उत्साहात साजरा करण्यात आला येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत हभप पांडुरंग महाराज आनंदे व त्यांच्या दांपत्यासह पांडुरंगाची यथायोग्य पूजा करून पहिल्यांदाच पांडुरंगाची घरी पूजा केली .
Leave a comment