---
माजलगाव, दि. 11 प्रतिनिधी :
तालुक्यातील केसापुरी येथील सबस्टेशनमधील पावर ट्रान्सफारमर पाच महिण्यांपासून बंद असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत माजलगाव सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन अर्जुन नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली लातुर येथील मुख्य अभियंता झोन कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत आठ दिवसात पावर ट्रान्सफारमर बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते आंदोलनाची दखल घेत आज पावर ट्रांसफार्मर बसवण्यात आला
केसापुरी येथील सबस्टेशनमधील पावर ट्रान्सफारमर पाच महिण्यांपासून बंद असल्याने या भागामध्ये शेतीसाठीचा विजपुरवठाा सुरळीत भेटत नाही. दिवसभरात लाईट आठ ते दहा वेळेस ट्पि होते त्यामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत होते. दोन हजार एकरवरील पिकांचा गंभिर प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत विज वितरण कंपनीस कळवुन देखिल दुर्लक्ष केले जात असल्याने माजलगाव सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन अर्जुन नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली लातुर येथील मुख्य अभियंता झोन कार्यालयासमोर शेतक-यांनी दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामुळे विज कंपनी कार्यालयाने दखल घेतली व येत्या आठ दिवसात केसापुरी येथील सबस्टेशनमधील पावर ट्रान्सफारमर बसविण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आज पावर ट्रांसफार्मर बसला त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या आंदोलनात व्हा.चेअरमन अर्जुन नाईकनवरे यांच्यासोबत आंदोलनामध्ये, कैलास मस्के, सुरज नाईकनवरे, विलास नाईकनवरे, उध्दव शेंडगे, बाळासाहेब कुरे, भागवत नाईकनवरे, गोरख नाईकनवरे, परमेश्वर नाईकनवरे, नारायण शेंडगे, दिनकर नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, संतोष नाईकनवर, दिगंबर सुक्रे, मुक्तीराम नाईकनवरे, अशोक जगतााप, विनोद जगताप यांचा सहभाग होता.
--- चौकट ---
अर्जुन नाईकनवरे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार
केसापुरी सबस्टेशनमधील पावर ट्रान्सफारमर बसल्याने दहा गावातील तीन हजार एकर जमिनीवरील पिकाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी युवा नेते अर्जुन नाईकनवरे यांचे जाहीर आभार यांनी मानले
Leave a comment