डोंगरकीन्ही /अमोल येवले
सध्या देशभर कोरोनो व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तू साठी च फक्त संचार बंदी शिथिल करण्यात आली आहे. प्रशासना कडून वेळो वेळी आदेश दिले जात आहेत.त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या कर्मचारी यांच्याकडून होणे गरजेचे आहे. पण काल डोंगरकीन्ही मध्ये सोशल डिस्टन्सचा फज्या उडाल्याचा दिसून आलं. काल सात ते साडेनऊ पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी संचार बंदी शिथिल होती .पण त्याच काळात नागरिकांनी इतकी गर्दी केली की सोशल डिस्टन्सचा फज्या उडाला.! काहींनी तर मास्क ही तोंडाला बांधले नाही. अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत होती. कसलाही सोशल डिस्टन्स पळाला जात नव्हता. त्यामुळे येथील नागरिक. व येथील प्रशासनास किती गांभीर्य आहे. या गोष्टी वरून लक्षत आले. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ना पोलीस,ना प्रशासन ना नागरिक कुणालाही गांभीर्य नसल्याने ही खूप खेदजनक बाबा आहे.सरकारच्या आदेशाची अमलबाजवणी नीट होत नसेल तर या महाभयंकर कोरोना व्हायरस ला आमंत्रण तर देत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Leave a comment