मोहम्मदिया कॉलनी व तुळजाभवानी नगर सील

भोकरदन । वार्ताहर

शहरात कोरोना महामारीने हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली असून आज 1 जुलै रोजी शहरातील तुळजाभवानी नगर येथील एक तर बाजारपट्टी भागातील मोहम्मदिया कॉलनी येथील या पूर्वीच कोरोण्टेन असलेल्या पैकी एक जण पॉझिटिव्ह आला .असे दोन जण आज पॉझिटिव्ह आल्याने शहरातील रुग्णांची संख्या अकरा झाली असून त्यातील दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात धिम्या गतीने का होईना पण रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिक ही बेचैन झाले आहेत. दरम्यान, शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात पुन्हा जनता कर्फ्यु पाळण्यात येऊन कोरोना ची साखळी तोडण्याची आवश्यकता असल्याचे सोशल मीडिया च्या माध्यमातून लोक मागणी करीत आहेत.

शहरात सध्या जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहेत त्यामुळे शहरात नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यातच नागरिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाही त्यामुळे व्हायचा तोच परिणाम होत आहे. शहरात हळूहळू रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, प्रशासनाने दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील जवळपास 31 जणांना कोरोण्टेन केले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णा पैकी एक रुग्ण भोकरदन येथील कोविड सेंटर येथे तर एका रुग्णाला उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आल्याचे नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ.अमित कुमार सोंडगे यांनी सांगितले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.