बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याबाहेरून आलेल्या आणि संशयित असलेल्या 9 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट शनिवारी (दि.11) दुसर्यावेळेस निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.विदेशातून अथवा बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना सौम्य लक्षणे जाणवताच जिल्हा सामान्य रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वारातीतील विलनीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे कक्ष कार्यान्वीत केले गेले आहेत.
आतापर्यंत ज्या संशयितांना दाखल केले होते, त्यांचे सात दिवसांनी पुन्हा थ्रोट स्वॅब घेतले जात आहेत. अशाच 9 जणांचे बीड जिल्हा रुग्णालयात तर अंबाजोगाईत नवीन आलेल्या एका संशयिताचा स्वॅब घेतला. याचा अहवाल प्राप्त झाला असून नऊही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर अंबाजोगाईचा अहवाल प्रलंबित आहे. आणखी नव्याने सहा संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 118 लोकांचे स्वॅब पाठविले होते. ते सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान, आष्टी येथील कोरोना बाधितावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा स्वॅब नगर येथूनच पाठविण्यात आलेला होता. सध्या त्याची प्रकृती ठिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment