परतूर, आष्टी, सातोना, वाटुर येथे आंदोलन 

शेतकर्‍यांना पीक कर्ज द्या नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील-राहुल लोणीकर 

परतूर । वार्ताहर

कोरोंनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आसतांना बँका शेतकर्‍यांची आडवणूक करीत आहेत. ही आडवणूक तत्काळ थांबवून शेतकर्‍यांना सन्मानची वागवणूक देत कर्ज उपलब्ध करून द्या नसता गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिला. ते परतूर येथे स्टेट बँक ऑङ्ग इंडिया समोर करण्यात आलेल्या आंदोलना प्रसंगी बोलत होते.  माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या आदेशाने परतूर तालुक्याती आष्टी, वाटुर, सातोना, परतूर येथील बँका समोर आंदोलन करण्यात आले. पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, शेतकरी आगोदरच कोरोणा संकटाने होरपळून निघाला आसून आशा परिस्थितित पेरणीचा हंगाम संपत आला आहे परंतु शेतकर्‍यांना बँका दाद देत नसतील तर याचे गंभीर परिणाम होतील असा गर्भीत इशारा त्यांनी यावेळी दिला.  

पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की,राज्यसरकारच्या बियाणे विकास महामंडळाने व काही बियाणे कंपन्यांनी शेतकर्यां ची ङ्गसवणूक करीत उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे शेतकर्यांेचा माथी मारले त्यामुळे हजारो एक्कर जमिनीवर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकर्यांेवर आली असून या संदर्भात माजी मंत्री तथा विद्यामान आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात प्रश्‍न उपस्थिती केल्या नंतर प्रशासन कॅबिनच्या बाहेर पडून शेतकर्‍यांच्या बांधावर गेले आणि पंचनामे केले.परंतु शेतकर्‍यांची ङ्गसवणूक करणार्‍यास राज्यसरकारच्या अखत्यारीतील बियाणे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, इगल कंपनी, कर्नुल कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. 

सोयाबीन न उगवल्याची खंडपीठानेही घेतली दखल

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने दखल घेऊन बोगस बियाणे उत्पादित करणार्‍या कंपन्या विरोधात बियाणे निरीक्षकाकडे तक्रार देऊनही कारवाई न झाल्यास पोलीसांकडे गुन्हे दाखल करण्याचे संगितले असल्याचेही राहुल लोणीकर म्हणाले. 

राज्यसरकार शेतकर्‍यांसंदर्भात असंवेदनशील

दुपार पेरणीचे संकट, कोरोनाने आर्थिक कणा मोडलेला शेतकरी सरकारच्या असंवेदनशीलते पुढे सावकाराचे उंबरठे झिजवत आसून सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेल्या राज्यसरकाचे वाभाडे काढतांना राहुल लोणीकर म्हणाले की,पेरणीचा हंगाम संपत आला तरी बँका शेतकर्‍यांना जवळ येऊ देत नाहीत. कोरोनाचे संकट आजूनही गडद होत आहे मात्र यावरून राज्यसरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. परतूर येथील आंदोलनासाठी राहुल लोणीकर यांच्यासह तालुका अध्यक्ष रमेश भापकर, नगरसेवक सुधाकर सातोनकर,संदीप बाहेकर, शहाजी राक्षे, संपत टकले, शत्रगुण कणसे,नितिन जोगदंड, नगरसेवक कृष्णा अरगडे, प्रकाश चव्हाण,जितू आण्णा अंभुरे, सुधाकर बेरगुडे, भागवत सुरुंग, दत्ता बिल्हारे, संतोष हिवाळे, विशाल कदम, प्रमोद राठोड, शिवाजी तरवटे, बजरंग वरकड, कैलास बोनगे, गणेश बोनगे, बंडू भुंबर, दत्ता बरकुले, हनुमान चिखले, शिवाजी भेंडाळकर, नामदेव कोरडे, विजय यादव यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

आष्टी, वाटुर,सातोना येथेही आमदार लोणीकरांच्या आदेशावरून आंदोलन

तालुक्यातील आष्टी येथे भाजपाचे जेष्ठ नेते मदनलाला सिंगी,रामप्रसाद थोरात,रंगनाथ येवले,गजानन लोणीकर,शिद्धेश्‍वर सोळंके,बंकटराव सोळंके,माऊली सोळंके,रावसाहेब आढे,मुरलीधर राठोड,विणायक लहाणे,प्रदीप आढे यांच्या सह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.  तर सातोना येथे विलासराव आकात,परमेश्‍वर आकात,विटठ्ल बिडवे,रोहण आकात,रंगनाथ रेंगे,आशोक खंदारे,ईसुङ्ग भाई,परमेश्‍वर लाटे,सुरेश मानवतकर,जणार्धन आकात,अच्युतराव आकात,विलास पाहेलवान,अमोल आकात,अजय आकात,भगवान आकात,दिगंबर आकात,संतोष मखमले,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  तर वाटुर येथील आंदोलना प्रसंगी विक्रम माने,गणपत वारे,राजू वायाळ,प्रकाश वायाळ,कारभारी सातपुते,संभाजी वारे,उद्धव वायाळ,माधवसिंग जनकवार,जगदीश पडूळकर,गजानन वायाळ,शुभम आढे,अजय तरासे,गणेश भगस,प्रकाश वाघमारे,रामजी शिंदे,संजय अवचार,यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.