बीड | वार्ताहर
कोव्हीड-19 या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून यासाठी
पेट्रोल पंप येथे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची ज्या ठिकाणी रांग लागणार आहे, त्या ठिकाणी प्रत्येकी अडीच मीटर अंतरावर परमनंट मार्किंग करावी. वाहने या रेषेच्या मागे उभी राहतील याची दक्षता घ्यावी असे आदेश अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
पेट्रोल पंपाजवळ इंधन भरतेवेळी प्रत्येक डिलीवरी पाईप जवळ वाहनांची एकच रांग असावी. एका डिलीवर पाईप जवळ कोणत्याही परिस्थितीत वाहने समांतर उभी राहू नयेत. दोन डिलीवरी पाईप करिता असणाऱ्या वाहनांच्या रांगेतील अंतर अडीच मीटर पेक्षा जास्त असावे. यासाठी अडीच मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर समांतर रेषांची आखणी करुन घ्यावी. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व कर्मचान्यांची नेमणुक करुन हे काम तातडीने आजच पुर्ण करावे. पेट्रोलपंपावर येणाऱ्या वाहनांमधील व रांगेमधील विहीत अंतर ठेवण्यासाठी पेट्रोलपंपावर प्रवेश करणाऱ्या पहिल्या वाहनापासुनच या अनुषंगाने दक्षता घेणे अपेक्षित आहे असे निर्देश दिले आहेत. सर्व संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी या आदेशाची नोंद घेऊन आजच आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी.
या सुचनांचे पालन न केल्यास व या ठिकाणी गर्दी आढळुन आल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 पोट कलम 2(अ), साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार गर्दी टाळण्यासाठी तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन होवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या आदेशाची भंग केल्यास भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
Leave a comment