कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्राला ता. 30 मंगळवार रोजी जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन खरेदी चा तपशिल घेतला कुंभार पिंपळगाव कापूस खरेदी केंद्र हे सर्वात जास्त आवक झालेले कापूस खरेदी केंद्र आहे परिसरातील नांव नोंदनी झालेल्या शेतक-यांना पैकी 800 शेतकर्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे.
या कापूस खरेदी केंद्रावर नुकतीच शेड उभारण्यात आले आहे सर्व शेतकर्यांचा कापूस खरेदी करा. सर्व शेतकर्यांचा शेवटपर्यंत कापूस खरेदी झाला पाहिजे व शेतकर्यांची अडवणूक होऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या योग्य भाव शेतकर्यांना मिळाला पाहिजे तसा यावेळी त्यांनी सूचना केल्या व आपल्या तालुक्यातील महामंडळाच्या सोयाबीनच्या बियाण्याची उगवणशक्ती झाली नसेल तर तात्काळ त्या शेतकर्यांचे पंचनामे करण्यात यावे असे कृषी विभागाला आदेश देऊन पंचनाम्यांचा अहवाल तात्काळ पाठवा नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या वेळी शेतकरी, कर्मचारी, तहसीलदार नरेंद्र देशमुख उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण सहाय्यक निबंधक ए.जे.भिल्लारे व संचालक मंडळ लालासाहेब शिंदे, भास्करराव गाढवे, अजिम खा पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती.
Leave a comment