15 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयातून टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील 09,चांगले नगर अंबड 01, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान, मंगळबाजार 02, संभाजी नगर 02 अशा एकुण 15 रुग्णास रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील विणकर मोहल्ला 7, हॉटेल अमित जवळील 3, वसुंधरा नगर 3, जुना जालना भागातील संजोग नगर 2,मस्तगड 01,भरत नगर 01,व्यंकटेश नगर 01,जेपीसी बँक कॉलनी 01, बरवार गल्ली 01,संभाजी नगर 01,सतकर नगर 01,अकेली मस्जिद 01,मिशन हॉस्पिटल रोड 01, मंगळबाजार 01,नरीमन नगर 01, खडकपुरा 1, दानाबाजार 01, पानशेंद्रा ता. जालना 01, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील 04 असे एकूण 33 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-4173 असुन सध्या रुग्णालयात-165,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1613, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-79, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5220 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-33 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-554, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4579 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-83, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1433. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती -1287, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-73, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-274, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-165,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15,कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-351, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-164 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-24, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13682, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 15 एवढी आहे.
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील रहिवासी असलेल्या 85 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा ञास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 27 जुन, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 28 जुन, 2020 रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 30 जुन,2020 रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. तसेच जालना शहरातील नरिमन नगर परिसरातील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय पुरुष रुग्णास मेंदुत रक्तस्त्राव होत असल्यामुळे व शरीराची डाव्या बाजूला लुळेपणा आल्यामुळे त्यांना दिनांक 28 जुन, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 30 जुन, 2020 रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला होता.त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 30 जुन, 2020 रोजी सकाळी 10-00 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 274 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-03,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना_28,संत रामदास वसतिगृह जालना-40,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-31, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-18,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-30,मॉडेल स्कूल परतुर-16,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-00,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _16,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-22,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-12, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय महविद्यालय जाफ्राबाद 00. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 896 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 829 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 4 लाख 76 हजार 230 असा एकुण 5 लाख 3 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment