माजलगाव:
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि, सुंदरनगर तेलगाव बु. ता.धारुर जि.बीड च्या वतीने आज दिनांक ११/४/२०२० पासुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने हॅण्ड सॅनिटायझरच्या उत्पादनास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशीलकाका सोळंके यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग होवु नये यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागल्यामुळे बाजारामध्ये त्याची टंचाई निर्माण झालेली असुन ही टंचाई दुर करण्यासाठी शासनाने ज्या कारखान्याकडे डिस्टलरी प्रकल्प आहे अशा कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझर उत्पादन घेण्यासंबंधी आवाहन केलेले होते या आवाहनास प्रतिसाद व सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभाग या उद्येशाने कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ.श्री.प्रकाशदादा सोळंके माजी मंत्री यांच्या सुचनेनुसार तातडीने कारखाना व्यवस्थापनाने हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनाचा निर्णय घेतलेला असुन त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आज दिनांक ११/४/२०२० रोजी पासुन कारखान्याचे डिस्टलरी प्रकल्पाचे माध्यमातुन रत्नसुंदर या नामांकनाचे हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात करण्यात आलेली आहे. ते पुढे म्हणाले की, कार्यक्षेत्रातील व्यक्तींनी तसेच भागातील व्यक्तींनी घराबाहेर न पडता स्वतः सह कुटूंब व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी कारखान्या मार्फत तयार होणारे हॅण्ड सॅनिटायझर लवकरच बाजारामध्ये वाजवी दरात उपलब्ध करुन देण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे धोरण आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादक व शेतकरी यांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन इतरत्र बाहेर न फिरता घरामध्येच रहावे व कारखान्यामार्फत आगामी काळात माफक दरात उपलब्ध होणा-या हॅण्ड सॅनिटायझरचा सातत्याने वापर करुन आपले आरोग्य सुरक्षीत ठेवणेची काळजी घ्यावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशीलकाका सोळंके यांनी केले.
Leave a comment