जालना । वार्ताहर
अखिल भारतीय काँगे्रस कमिटीच्या वतीने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा वाढविलेला दर मागे घेण्यासाठी देशभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. 29 जून सोमवार रोजी सकाळी 11. 30 वा. जुना जालना गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे अन्यायकारक दर वाढविल्यामुळे त्याचा माल वाहतूकीवर मोठा परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे. यामुळे जनसामान्याचे सगने कठीण बनले आहे.
केंद्र सरकारने इंधन दर वाढ ताबडतोब मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्ङ्गे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत, राहुल देशमुख, विमलताई आगवाले, विजय जर्हाड, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, गुरूमीतसिंग सेना, शेख शमशु आदी पदाधिकार्यांनी केले आहे.
Leave a comment