लोकप्रश्नच्या बातमीचा दणका
गणेश कृषी सेवा विक्री परवाना रद्द प्रगती कृषी सेवा केंद्राचा दुकान निलंबित
तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कृषी सेवा केंद्रातील काही कृषी चालत यांची मनमानी करून युरिया खताच्या लिंकिंगच्या नावाखाली शेतकर्यांची अडवणूक व आर्थिक लूट या मथळ्याखाली दैनिक लोकप्रश्न दिनांक 13 6 2020 जून रोजी कृषी बातमी दणक्याने जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे व गुणनियंत्रण कृषी तज्ञ एस डी गराडे यांनी तात्काळ तीर्थपुरी येथे त्याच दिवशी येऊन साथ कृषी सेवा केंद्राची भेटी देऊन तपासणी केली त्यावेळी शासनाचे नियम धाब्यावर बसून विनापरवाना भूसुधार खताची विक्री करून गोरगरीब शेतकर्यांची आर्थिक लूट करीत असल्याची या भूसुधारक खताच्या सापडलेल्या साठ्याच्या वरून दिसून आले.
तसेच खत लिंकिंग च्या नावाखाली खताची टंचाई दाखवून खत देण्यास शेतकर्यांना नकार देऊन काही कृषी सेवा केंद्राची मनमानी केली होती तसेच या कृषी सेवा केंद्रातून शासनाची भावफलक स्टॉक रजिस्टर विक्री परवाना परवाना लायसन दर्शनी भागात लावलेले दिसून आल्यामुळे गुरुकृपा कृषी सेवा केंद्र गणेश कृषी सेवा केंद्र अभयराज कृषी सेवा केंद्र प्रगती कृषी सेवा केंद्र साईराज कृषी सेवा केंद्र गीता कृषी सेवा केंद्र बालाजी ग्रो कृषी सेवा चालकांना कारणे दाखवा नोटीस जिल्हा कृषी अधिकार्यांनी बजावले होती यावरून काल दिनांक 25 6 2020 रोजी यामधील उमेश लोया गणेश कृषी सेवा केंद्राचा विक्रीचा परवाना कायमचा रद्द केला तसेच सुदाम खेत्रे यांच्या प्रगती शेतकरी कृषी सेवा केंद्राचा खत विक्री परवाना तडकाफडकी निलंबित करून 2 दोन कृषी सेवा केंद्रावर कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केल्या असून तसेच उर्वरित पाच कृषी सेवा केंद्रांना यापुढे शासनाचे नियमाचे पालन करून कोणतेही नियमाचे उल्लंघन केल्यास त्याची गय केली जाणार नाही अशी टाकीत संबंधित पाच कृषी सेवा केंद्रांना नोटिसा द्वारे देण्यात आली तसेच या कृषी सेवा केंद्रावर दहा दिवस उलटले तरी संबंधित कृषी अधीक्षक कारवाई गुलदस्त्यात या मथळ्याखाली दैनिक लोकप्रश्नमध्ये बातमीच्या दणक्यामुळे तसेच संघटनेचे संघटन अप्पासाहेब कुडेकर पाटील यांनी बेमानी करणार्या कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कारवाई करावी आंदोलन करू असा इशारा दोन दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता तसेच कारवाई विलंब होत असल्यामुळे काही शेतकरी कृषी मंत्री दादासाहेब फुसे यांच्याकडे तक्रारी करणार असल्याचा इशारा देण्यात आला असताना जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तसेच उर्वरित काही कृषी सेवा केंद्राची ही जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे यांनी अचानक तपासणी करावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
Leave a comment