जालना । वार्ताहर
बदनापुर तालुक्यातील रोषणगाव परीसरात बुधवार रोजी रात्री झालेल्या ढग फुटीमुळे शेतातील पिके नष्ट होवुन शेततळाचे स्वरुप तयार झाले आहे. यामुळे शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणाचे रस्ते वाहुन गेलामुळे गावाच्या संर्पक तुटला आहे. जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या निरीक्षश समितीने नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेवुन त्यांच्या तक्रारी ऐकुन घेतल्या आणि सबधित अधिकार्याणा घटनास्थाचे पंचेनामे करुन नुकसान भरपाईचे अहवाल देण्याचे सुचित केले.
आ.कैलास गोरंट्याल यांनी मदत व पुर्नेवसन तथा मुदतकार्य मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना शेतकर्या समक्ष दुरध्वनीव्दारे या बाबची हकीकत सागुन ताबतोब निवेदन केले. जिल्हा कॉग्रेस कमेटीच्या पाहणी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, जिल्हाकार्यध्यक्ष राजेदं राख, शहरअध्यक्ष शेख मेहमुद, वंसत जावध, राम सांवत, लक्ष्मण महसलेकर, राजेदं जैस्वाल, सुभाष मगरे, मोबिनखान, जावेद बेग, असलम, शेख अनवर आदी दिसत आहे.
Leave a comment