पंचनामा करून शासनाने मदत करण्याची मागणी
बदनापूर । वार्ताहर
तालुक्यातील दक्षिण भागात पावसाचा दुसर्यांदा कहर केला असून दोन आठवडयात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, दि 24 रोजीच्या मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाने या भागातील कृषी उत्पादनाला मोठा ङ्गटका दिला असून या भागातील ङ्गळबागा व पेर केलेले शेती वाहून गेली तर नुकतेच लोकसहभागातून झालेले बंधारे व कटटे ङ्गुटून गेले, काही शेतकर्यांच्या विहीरी या पाण्यामुळे बुजून गेला तर बाजारवाहेगाव शिवारातील काही बैले, बैल गाडया व शेती उपयोगी अवजारे वाहून गेली तर सुखना, लहुकी, दुधना नदींना बारा वर्षानंतर पहिल्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या असून या नदीकाठच्या शेती पार खंगाळून गेल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बदनापूर तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीत होती. यंदा मात्र निसर्गाने तालुक्यात पावसाने कसर भरून काढण्याचा धडाका लावल्याचे दिसून येत असून गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मारा केल्यामुळे बदनापूर व अंबड तालुक्यातील सिमारेषेवर असलेले व बदनापूर शहराच्या दक्षिणेकडील रोषणगाव, मांजरगाव, धोपटेश्वर, कुसळी, बाजारवाहेगाव, चिकनगाव, नानेगाव, माहेरभायगाव, देशगवव्हान, बदापूर, सायगाव, अवा, अंतरवाला या गावात मागील आठवडयातच अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले होते. पेर केलेले सर्व खरीपाचे बियाणे वाहून गेलेले असतानाच गुरुवारीच्या (दि. 24 व 25) रात्री 12 वाजेपासून ते पहाटे 5 पर्यंत वरील गावासह अकोला, निकळक, कंडारी, वाल्हा, रामखेडा आदी गावातही अतिवृष्टी झाली. या भागातील शेतीत प्रचंड पाणी तुंबल्यामुळे शेती खरडून निघाली. रामखेडा शिवारातील गट क्रमांक 66 मधील अशोक घुगे यांच्या शेतात प्रचंड पाणी तुंबलेल्यामुळे नुकतेच लावलेली सरकी लागवण वाया गेल्याचे दिसून येत आहे. बाजार वाहेगाव येथील राजेंद्र काळे यांचे बैल् वाहून गेले तर वाहून जाणारे काही बैल् गाळात व काटया ङ्गसलेले सकाळी आढळून आल्यामुळे शेतकर्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. येथील अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून ङ्गळबागा वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बाजारवाहेगाव येथील बाबासाहेब शेषराव ढवळे हे शेतवस्तीत रहात असलेल्या शेतकर्यांचे राहते घर, बैलगाडी, बकर्या-कोंबडया वाहून गेल्या. नगदी 25 हजार रुपयांसह घरगुती साहित्य वाहून गेले. कपडे लत्ते, भांडे वाहून गेल्यामुळे हे कुटुंब उघडयावर पडले आहे. येथील सुरेश भाऊराव काळे या शेतकर्याच्या गट क्रमांक 00 मधील पाच एकर मोंसबी ङ्गळबागाची शेती पार खरडून निघाले असल्यामुळे बाजारवाहेगाव परिसरात प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झालेली आहे. तालुक्यातील अर्धाअधिक भागात या प्रचंड पावसाने कहर केलेला असून सुकना, लहुकी, दुधना नदी 12 वर्षानंतर पहिल्यांदा दुधडी भरून वाहिली. नदी काठच्या गावात पानी घुसल्यामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. तथापि सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी शेतकर्यांचे मात्र प्रचंड नुकसान या पावसाने झाले आहे. बदनापूर शहरातील हुसेननगर व दुधना नदीकाठच्या घरात पाणी शिरले होते.
Leave a comment