जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेतकर्‍यांच्या बांधावर 

परतूर । वार्ताहर

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या दणक्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात बघायला मिळत असुन ऐरवी कोरोनाच्या अवडंबर करत अधिकार्‍यांनी कॅबीन सोडले नव्हते मात्र आमदार लोणीकर यांनी बैठक घेताच प्रशासनातील जिल्हाधिकार्या पासून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे जिल्हाधिकारी रविद्र बिनवडे यांनी निरखेडा तालुका जालना येथील जाधव यांच्या शेतावर जाऊन महाबीज कंपनीचे न उगवलेल्या सोयाबीन शेताची पाहणी केली. त्याच बरोबर जिल्हाभरातील कृषी विभाग कामाला लागला असून शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सोयाबीनचे न उगवलेल्या बियाणांच्या शेतीचे पंचनामे करीत आहेत.बियाणे महामंडळाच्या चुकीच्या प्रायश्‍चित शेतकर्‍यांना भोगावे लागत असून जिल्ह्याभरातील हजारो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन पेरणी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या वर्षी सुरवातीपासुनच मान्सुनाचा पाऊस चांगला पडला त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने सोयाबीन बियाणे खरेदी केले,खते घेऊन पेरणी केली माञ शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी ङ्गेरण्याचे काम बियाणे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने विविध कंपण्याची उगवण क्षमता नसलेली बियाणे शेतकर्यांच्या माथी मारली.आधीच कोरोणा संकटात सापडेल्या शेतकर्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करून महगामोलाचे बियाणे शेतात पेरून व खते देऊन बळीराजा निश्‍चित झाला होता परंतु सोयाबीन बियाणेच न उगवल्याने बी-बियाणे खते व मेहनत वाया गेली असुन दुबार पेरणीसाठी शेतकरी पैशाची जुळवा जुळव करतांना उबरंठे झिंजवतांना दिसत आहे.

 सरकार ने शेतकर्‍यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत हजारो हेक्टर शेतजमिनीवरील सोयाबीनचा पेरा केलेले बियाणे व खते मातीत मिसळली असुन सरकारने शेतकर्यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी किमान मोङ्गत बियाणे व खते तात्काळ उपलब्ध करून द्यावीत असे आ.बबनराव लोणीकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाचा साधारणताह 500 कोटी रूपयांचा विकास निधी पाठवला परत जिल्हातील विविध विकास कामांचा निधी लॉकडाऊनच्या काळात सार्वजनीक बांधकाम विभाग -1 चा 42 कोटी व सार्वजनिक बांधकांम विभाग -2 चा 22 कोटी सह इतर विभागांचा साधारणतहा 500 कोटी रूपयांचा निधी परत पाठवला गेला असुन त्यामुळे विकासाच्या कामामध्ये खंड पडला आहे. प्रशासनाने या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आ.लोणीकरांनी म्हटले आहे. कापूस खरेदीचा वेग वाढवावा- जिल्ह्याभरात अनेक शेतकर्‍यांचा कापूस विक्री अभावी घरात पडून असून हा कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयने वेग वाढवावा तसेच महाराष्ट्र सरकारनेही कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत जेणेकरून आर्थिक संकटात सापडेलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळेल संकटाच्या काळात सरकार मात्र ढिम्म पडल्याचे चिञ दिसत आहे असे आ.लोणीकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी नतंर प्रशासन लागले कामाला जिल्हाधिकारी कार्यालयात परवा झालेल्या बैठकी नतंर प्रशासन कामाला लागले आसून जिल्हयातील सर्व विभागांची गतीमानता वाढल्याने आपण समाधानी आसल्याचे आ. लोणीकर यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे. मात्र कामचूकारपणा करणा-यां अधिका-यांची गय केली जाणार नाही कोरोनाच्या नावाखाली जनसामांन्याना वेठीस धरणार्‍या कामचूकार अधिकारी,कर्मचा-यांची गय केली जाणार नसल्याचे आ.लोणीकर यांनी शेवटी नमूद केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.