बदनापूर । वार्ताहर
बदनापूर येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अनेकांच्या घराला पाण्याच्या धारा लागल्या तर दुसरीकडे याच वेळी तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला आग लागली आणि बघता बघता आगीने पेट घेतल्याने या विभागातील निवडणूक अभिलेखे जळून खाक झाल्याची घटना पहाटे 4 वाजता घडली असून कोषागार कार्यालयात कर्तव्यवर असलेले पोलीस कर्मचार्याच्या निदर्शनास आल्याने तातडीने अग्निशामक दलास पाचारण करून आग विझविण्यात आली.
या विभागात मागील 15 वर्षाचे निवडणूक रेकॉर्ड होते बदनापूर तालुक्यात 25 जून रोजी पहाटे 3 वाजता अचानक विजेच्या कडकडाट सह मुसळधार पाऊसास सुरवात झाली आणि आणि अनेक गोर गरिबांच्या घराला गळती लागल्याने लोक जागी झाले तर 3:30 वाजता जोरदार वारा आणि पाऊस सुरू होऊन वीज पुरवठा देखील खंडित झाला तर दुसरीकडे बदनापूर तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक विभाग खोलीतून अचानक धूर निघू लागल्याचे कोषागार कार्यालयात कर्तव्य वर असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या निदर्शनास आले असता सदर कर्मचार्याने पाठीमागून जाऊन बघितले असता आग लागल्याचे दिसून आल्याने तातडीने त्या कर्मचार्याने तहसीलदार छाया पवार व अग्निशामक दलास माहिती दिली बदनापूर तहसील कार्यालयात आग लागल्याची माहीती मिळताच तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार संजय शिंदे, दळवी, समद ङ्गारुकी, मंडळ अधिकारी पाउलबुद्धे, तलाठी सुनील होळकर यांनी तहसील कडे धाव घेतली दरम्यान 5 वाजता अग्निशामक दलाची तुकडी पोहोचली व आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले असता काही मिनिटात आग आटोक्यात आली मात्र या विभागात असलेले मागील 15 वर्षाचे विधानसभा,ग्राम पंचायत, पंचायत समिती निवडणुकीचे कागदपत्रे जळून खाक झाले.
Leave a comment