भोकरदन । वार्ताहर

तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकायांना खरीप हंगामासाठी त्वरीत कर्ज वाटप करणे तसेच शासनाने घोषीत केलीली कर्जमाङ्गीची तात्काळ अंमलबजाणी करावी या प्रमुख मागण्यासाठी दि. 24  भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष  दानवे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेसमोर धरणे अंदोलन करुण तहसिलदार भोकरदन व बॅक शाखा व्यवस्थापक यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष मुकेशभाऊ चिने, जि.प.सदस्या आशाताई पांडे, भाजपा शहराध्यक्ष सतिष रोकडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक पा. जाधव, पं.स.सभापती विनोद गावंडे, सिध्देश्‍वर सह साखर कारखाना व्हाईस चेअरमन गणेश पा. ठाले,  मा.सभापती ङ्गकिरचंद इंगळे, गंगाधर कांबळे, पं.स.सदस्य, ऋषिकेष पगारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, पावसाळा सुरु झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकायांचे पिककर्ज वाटप अदयाप झालेले नाही. राज्यामध्ये कोरोना विषाणुचे संकट असले तरी पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीचे कामे थांबवता येत नाही त्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्ज माङ्गीची अंमलबाजावणी करावी व नविन पीककर्ज वाटप सुरु करावे असे ते म्हणाले. राज्यात लाखाच्यावर शेतकायांचा कापूस व रब्बी हंगामातील मका व हरबरा घरामध्ये पडुन आहे. राज्यसरकारच्या या कुचकामी धोरणामुळे शेतकायांना खाजगी व्यापाायांना आपला माल कमी भावामध्ये विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकायांची मोठया प्रमाणावर आर्थिक पिळवणुक होत आहे. बियाणे, खते व मजुरी कशी भागवावी हा यक्षप्रश्‍न राज्यातील शेतकायांना पडला आहे. त्यामुळे राज्यशासनाने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकायांना तातडीन पीककर्ज दयावे आशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्यसरकारच्या बांधवर खत आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडाला आहे. 

भाजपाने ङ्गेब्रुवारी महिण्यामध्ये शेतकायांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले होते व त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नियीमत कर्जङ्गेड करणााया शेतकायांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली होती. परंतु अदयाप त्या बाबत सुध्दा राज्यसराकरच्या वतीने काहीही हालचाल दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारने 22 मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्यामुळे शेतकायांच्या खात्यात कर्जाची रक्कम भरु शकत नाही याची कबुली देवुन शासनाच्या नावे कर्ज मांडावे  असे बँकांना सांगितले. बँकानी या शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत या इशाायाला बँका जुमानत नाहीत.  मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करत नाहीत, हा शेतकायांचा अनुभव आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकायांना हेक्टरी कोरडवाहुला 25000 रुपये व ङ्गळबागांना 50000 रुपयांची घोषणा सरकार विसरले आहे असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार शेतकायांचे प्रश्‍न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे आपण त्यांच्या तिव्र शब्दात निषेद करत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या ध्येय धोरणामध्ये तातडीने सकारात्मक बदल करावा अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी शेतकायांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरुण तीव्र अंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला दिला. यावेळी नगरसवेक, सुरेश शर्मा, रणविर देशमुख, दिपक बोर्डे, राहुल ठाकुर, मा.उपसभापती दादाराव राऊत, संजय पोङ्गळे, भगवान गाढे, भास्कर ठोंबरे, मधुकर मुंगटराव, भगवान गिरणारे, कचरु विरे, विजय कड, शेख कयुमशेठ, राजु पांडे यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.