कोमजुन जाणार्या पिकांना जीवदान दहा दिवसाच्या खंडानंतर पावसाचे झाले अगमन
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परिसरात गेल्या आठ दाहा दिवसा पासून पावसाने दडी मारली होती ता. 25 गुरुवार रोजी दुपारनंतर पावसाचे वातावरण झाले. सायकांळी 5 वाजता पावसाला सुरुवात झाली तब्बल दहा दिवसाच्या खंडानंतर पाऊस चे आगमन झाले. कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ, लिंबी, धामणगाव, गुंज, मुर्ती, भादली, उक्कडगाव, राजा टाकळी, आरगडेगव्हाण, पिंपरखेड, लिंबोनी आदि गावात जोराचा मध्यम पाऊस झाला.
मृग नक्षत्रात पेरणी झाली होती कापूस सोयाबीन आदी पिके उगवून वर आली होती. पाऊस नसल्यामुळे पिके कोमजुन सुकू लागली शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहते की काय अशी चिंता लागली होती गेल्या आठ-दहा दिवसांपासून कडक ऊन व वारा सुटल्याने ऊगउन वर आलेली पिके सुकू लागली होती शुक्रवारी सायंकाळी पावसाचे आगमन झाले पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकर्यांनच्या चेहर्यावर समाधान दिसून आले पेरणी राहीलेल्या शेतकर्यांची पेरणी साठी घरात बियाणे घेऊन ठेवले होते परंतु पावसाने उघडीप दिल्याने पेरणी साठी पाऊस पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता पाऊस झाल्याने शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील असे शेतकर्यांनी म्हटले असून सर्वत्र पाऊस झाल्याने सध्यातरी शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
Leave a comment