भोकरदन । वार्ताहर

भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस चपला मारून निषेध आंदोलन करण्यात आले. याविषयी अधिक माहिती अशी की,भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य केले होते या वक्तव्याचा प्रकरणी भोकरदन येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून व प्रतिमा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तर पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते याविषयी भोकरदन येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. 

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशाच्या आदरणीय राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी  बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून देशातील प्रमुख नेत्यावर पातळी सोडून व हीन वक्तव्य केल्याप्रकरणी सदरील व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी गोपीचंद पडळकर यांनी यानंतर असे वक्तव्य केल्यास महाराष्ट्रामधील जनता त्यांना रस्त्यावर ङ्गिरू देणार नाही असे सांगितले तर यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे,प्रा.डॉ. अंकुश पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष,मंगेश जाधव, विशाल पोटे, शेख कदिर बापू, अजहर शाह, प्रा नईम कादरी,महेश औटि, ङ्गईम कादरी, पुंजाराम साबळे,ईश्‍वर पांडे,रामेश्‍वर पाटिल जंजाळ, अनिल गावंडे,भागवत पांडे,शंकर गिरणारे, रईस शेख,आत्माराम खेकाले, नाना कराळे,संजय पाटील, बापू पाटील, संजय दळवी,सुखदेव सावंत, जनार्धन खडके, राजेंद्र कानडजे आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.